तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रामध्ये ‘बालविवाह मुक्त जिल्हा’ उपक्रमांतर्गत शपथ ग्रहण सोहळा संपन्न सिंदखेडराजा | प्रतिनिधी प्रशासनाच्या ‘माझा जिल्हा, बालविवाह मुक्त जिल्हा!’ या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत सिंदखेडराजा तालुक्यातील तांदुळवाडी येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाद्वारे समाजातून बालविवाहाची प्रथा नष्ट करण्याचा संकल्प करण्यात आला. दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी, रूम्हणा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जांभोरा बिटमधील तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ‘बालविवाह विरोध संबंधीची शपथ’ देण्यात आली. या प्रसंगी तांदुळवाडीतील सर्व नागरिक व ग्रामस्थ.महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थी.अंगणवाडीतील विद्यार्थी व पालकवर्ग.आशासेविका उपस्थित होते,या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंगणवाडी सेविका प्रिया तेजकोर प्रकाश खरात यांनी उपस्थितांना बालविवाह विरोधात सविस्तर मार्गदर्शन केले. बालविवाहाचे दुष्परिणाम आणि हा सामाजिक कलंक पुसून टाकण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे कसे गरजेचे आहे, यावर त्यांनी भाषणातून प्रकाश टाकला.उपस्थित सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे बालविवाह न करण्याची आणि समाजात तसा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध करण्याची शपथ घेतली. या उपक्रमामुळे तांदुळवाडी परिसरात बालविवाहाच्या प्रथेविरुद्ध एक सकारात्मक संदेश गेला आहे.

सिंदखेडराजा | प्रतिनिधी प्रशासनाच्या ‘माझा जिल्हा, बालविवाह मुक्त जिल्हा!’ या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत सिंदखेडराजा तालुक्यातील तांदुळवाडी येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Read More
नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावा ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

बुलढाणा, दि. 20 (जिमाका): चिखली तहसील कार्यालय येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.…

Read More