बुलढाणा: “नगरपालिका हद्दवाढ नकोच” अशा ठाम भूमिकेतून आज बुलढाण्यातील पाच गावांतील हजारो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड ‘जनआक्रोश मूक मोर्चा’ काढला. सागवन, सुंदरखेड, येळगाव आणि माळविहीर या गावांच्या हद्दवाढीच्या प्रस्तावामुळे ग्रामीण जनतेमध्ये तीव्र संताप असून, प्रशासनाच्या ‘हुकूमशाही’ निर्णयाविरोधात हा मोर्चा धडकला.शहरातील जिजामाता प्रेक्षागार येथून या मोर्चाची सुरुवात झाली. हातात निषेधाचे फलक आणि शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मूक मोर्चाने संपूर्ण बुलढाणेकरांचे लक्ष वेधून घेतले. *’गाव बचाव कृती समिती’*च्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय होता.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर विविध गावांच्या महिला प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले:
लोकशाहीचा खून: नगरपालिकेला स्वतःचा ठराव घेऊन हद्दवाढ करण्याचा अधिकार नाही. हद्दीत सामील व्हायचे की नाही, हा अधिकार ग्रामसभा आणि जनतेचा आहे.
ग्रामपंचायतींचा विरोध: सागवन, येळगाव, सुंदरखेड, माळविहीर या सर्व ग्रामपंचायतींनी आधीच हद्दवाढीला विरोध दर्शवणारे ठराव दिले असतानाही प्रशासनाने हा प्रस्ताव शासनाकडे का पाठवला? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
चुकीचा अहवाल: तहसीलदारांनी नागरी सुविधा आणि अकृषिक क्षेत्राबाबत चुकीचा अहवाल दिल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.हा अन्यायकारक हद्दवाढ प्रस्ताव तात्काळ रद्द न केल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता सरकार या जनआक्रोशाची दखल घेणार की हद्दवाढीचा निर्णय लादणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आ


